प्रतिनिधी -
🧐 तुम्हाला माहिती असेल, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवावर निर्बंध आले होते. मात्र, यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.
🚣♀️ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने POP मूर्तींचे विसर्जन नदी, सरोवर वा तलावात करण्यास बंदी घातली आहे. - तसेच काही नियम देखील जाहीर केले आहेत
💁♂️ *पहा कशी आहे नियमावली ?*
● स्थानिक प्रशासनाने मुबलक प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत.
● कृत्रिम तलाव भरल्यास, प्रशासनाने विसर्जनासाठी अतिरिक्त सोय करावी.
● मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक व नैसर्गिक मातीच्या मूर्ती तयार कराव्यात.पीओपी, थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर टाळावा.
● मंडळांनी कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, सजावटीसाठी नैसर्गिक साहित्य व रंग वापरावेत.
● कृत्रित तलाव तयार करताना आत जाड ताडपत्रीचा वापर करावा, कृत्रिम तलावाला गळती नसावी.
● भरती-ओहोटीचा विचार करूनच समुद्रात मूर्तीचे विसर्जन करावे
● घरगुती मूर्तींचे विसर्जन शक्यतो पाणी भरलेल्या बादलीत करावे.
● विसर्जन करताना मूर्तीवरील दागीने, निर्माल्य काढूनच मूर्ती विसर्जीत करावी.
● विसर्जनापूर्वी आणि नंतर तज्ज्ञांनी पाण्याची गुणवत्ता तपासावी.
*आपण थोडस सहकार्य करा* -
ही माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Post a Comment