स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्तने स्वातंत्र्यदिन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोदरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून नाविन्यपूर्ण प्रभातफेरी काढत भारतमातेचा ,तिरंग्याचा जयघोष केला सकाळीच प्रभातफेरी मध्ये भारत मातेचा वेश धारण केलेली विद्यार्थिनी, तिरंगा वेशातील विद्यार्थीनी इंग्रजांना पळून लावणारी अश्वारूढ झाशीची राणी, इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद हे क्रांतिकारक, इंग्रजांना चलेजाव चा आदेश देणारे महात्मा गांधीजी ,पंडित नेहरू व इतर स्वातंत्र सैनिक हे गोदरी गावातील नागरिकांना स्वातंत्र्यसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देत होते त्याचप्रमाणे देशासाठी अहोरात्र लढणारे सीमेवरील सैनिक या सर्वांच्या अनोख्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होते गावातून प्रभात फेरी सादर होत असताना वाजवले जाणारे देशभक्तीपर गीते व झांशी ची राणी लक्ष्मीबाईचे माताभगिनींनी केलेले औक्षण या सर्वांमुळे सर्व गावात उत्साह संचारला होता व सर्वत्र भारत मातेचा -तिरंग्याचा जयघोष होत होता प्रभातफेरी नंतर शाळेत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाविषयी भाषणे व गीते सादर केली .
ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधाताई बकाल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खरे हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये गावच्या सरपंच सखुबाई दहिकर तसेच उपसरपंच भरत जोगदंडे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी,अंगणवाडी सेविका,ता.मु.अध्यक्ष,पो.पाटिल तसेच गावातील सर्व कर्मचारी वर्ग सह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता उपस्थिती मध्ये असणारे उपसरपंच भरत जोगदंडे यांनी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर सह सर्वच शिक्षकांचे व शाळा समितीचे भरभरून कौतुक केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सह सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र नादरकर सर यांनी केले तर आभार गोदरी ग्रामपंचायतचे सचिव बि.के.परिहार यांनी मानले
Post a Comment