सावदा प्रतिनिधी - प्रदिप कुळकर्णी
14 सप्टेंबर 2021 रोजी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अंतर्गत साक्षी पाटील यांची तालुका समन्व्यक या पदावरून तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आली होती, 2020 मध्ये साक्षी ने उत्तम रित्या टीम वर्क केले, प्रत्येक उपक्रमात उत्फूर्त पणे सहभाग नोंदवला आणि ह्याच गुणाचं निरीक्षण संपूर्ण राज्य, जिल्हा, तालुका करत होता, फळ स्वरूप साक्षी 2021 रोजी सर्वानुमती बिनविरोधक यावल तालुका अध्यक्ष झाली,आणि तीच्या ह्या कार्यकाळात तिने एकूण 12 उपक्रम घेतले, ज्यात संपूर्ण टीम सक्रिय पणे प्रतिसाद नोंदवत असे, राज्य अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व तालुका अध्यक्ष साक्षी ह्यांच्या आधीप्त्याखाली पुढील उपक्रम घेण्यात आलेत, पोलीस वर्धापन दिन हा पोलिसांचा सन्मान करून साजरा करण्यात आला, रक्षाबंधन हेच सुरक्षा बंधन म्हणून डॉक्टर, पत्रकार,पोलीस, सफाई कर्मचारी व इतर कोविड योद्धा यांच्या सोबत साजरा करण्यात आले, 15 ऑगस्ट ला वृक्षारोपण व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार पार पाडण्यात आला, 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण संघटने अंतर्गत चाळीसगाव येथे अतिबृष्टी झाल्यामुळे यथोचित मदत पोहोचवण्यात आली, 11 ऑक्टोबर रोजी अमृत महोस्तव निमित्त स्वच्छ भारत एक कदम स्वछता कि और हा उपक्रम घेण्यात आला ज्यात फैजपूर नगरपरिषद चा खारी चा वाटा होता, प्लास्टिक मुक्त अभियान हे जे.टी. महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल सोबत घेण्यात आले,
दिवाळी हा सण सर्वांसाठी बहुमूल्य असतो पण हा सण प्रत्येक व्यक्ती मनवू शकेल असं नाही म्हणून जळगाव येथील दिव्याग उडान फॉउंडेशन अंतर्गत दिवे विकत घेऊन फराळ व वस्त्र वाटप आदिवासी पाड्यावर करण्यात आले, जेणेकरून दिव्याग मुलांना आर्थिक मदत झाली आणि गरीब मुलं सुद्धा सणाचा आनंद घेऊ शकले,26 जानेवारी रोजी चित्रकला, गितगायन, वक्तृत्व स्पर्धा फैजपूर येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार विभागासोबत घेण्यात आली ज्यात सतरा वर्षा पर्येंतच्या एकूण 80 मुलं मुलींनी भाग घेतला व एकूण पंधरा बक्षीस वाटप करण्यात आले,8 मार्च हा महिला दिन असतो म्हणून संघटने मार्फत आदर्श शिक्षिका, भाजीपाला विक्री करणाऱ्या मावशी, घरकाम करणाऱ्या आजी, बालसंस्कार घेणाऱ्या मॅडम, आदर्श माता, आशावर्कर, मॉल मध्ये काम करणाऱ्या मावशीचा स्मृती चिन्ह देऊन यथोचित सन्मान करून कामाचं कौतुक केल, शिवराज्याभिषेक दिनी वृक्षारोपण करून त्यांचं जतन करू अशी शपथ घेण्यात आली,
या सर्व उपक्रमांमध्ये राज्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, समन्व्यक, तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुका सचिव, तालुका समन्व्यक यांच्या एकमताने सर्व उपक्रम घेण्यात येत, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद च उदिष्ट म्हणजे प्रत्येक मुलामुलींना योग्य ते हक्काच व्यासपीठ मिळावं, आपले विचार चार लोकांपर्यत पोहोचवणे व समाजात जागरूकता आणणे, या संघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व पदाधिकारी हे तरुण युवक व युवती आहेत,
तालुका अध्यक्ष साक्षी ने सर्व टीम चे मनापासून धन्यवाद केले, तिला टीम ने प्रत्येक वेळेस योग्य ते सहकार्य केले, साक्षी ला असे वाटते कि काम कुठल ही असो त्यात एक निष्ठा असावी, कामाप्रति उत्साह हवा, काम नेहमीच शिस्त बद्द पार पडायला हव, काही झालं तरी साक्षी A SUCCESSFUL TEAM IS A GROUP Of MANY HAND'S AND ONE MIND या ब्रीद वाक्यावर ठाम विश्वास ठेवते, आणि प्रत्येक उपक्रमात अशाच पदतीने तालुक्यातील एकूण 25 पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोटिवेट करत राहिली, आणि सर्व उपक्रम आनंदात पार करत गेली, अनुभवातून माणूस शिकतो हार जीत ही होत असते म्हणून परिणामाचा विचार माणसाने कधी करू नये असं साक्षी ने शेवटी सांगितले, व सर्व पोलिस, डॉक्टर, पत्रकार, नगरपालिका, वकील,विविध शाळा, गाव, व संपूर्ण संघटनेचे आभार मानले ज्यांनी तिला ह्या व्यासपीठावर इतकी मोठी जबाबदारी सोपवली, खास धन्यवाद पत्रकारांचे साक्षी ने मानले ज्यांनी प्रत्येक उपक्रमाचा योग्य तो आढावा जबाबदारी ने घेतला.
Post a Comment