Khandesh Darpan 24x7

आज होणार देशभरातील चित्रपटगृहे हाउसफुल्ल, फक्त ७५ रुपयात पाहता येणार चित्रपट...



आजचा दिवस म्हणजेच २३ सप्टेंबर हा दिवस चित्रपट रसीकांसाठी खूप खास आहे, कारण आज देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे.


मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (MAI) २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशातील ४००० स्क्रीनवर केवळ ७५ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्याची ऑफर आणली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये विक्रमी संख्येने आपली उपस्थिती नोंदवता येईल. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग खूप चांगले असल्याचे सांगितले जाते.


मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (MAI) एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये  म्हटले की चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग उत्कृष्ट झाले आहे.


दशभरातील सिनेसृष्टी 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या माध्यमातून प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून त्यांना कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने पुढे लिहिले की, 'PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage, Citypride, Asia, Mukta A2, Movie Time, Wave, M2K आणि Delight सारख्या मल्टिप्लेक्सनेही या उपक्रमात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.'


चित्रपटगृहे आणि तिकिटांच्या किंमतीबाबतच्या राज्य नियमांमुळे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यासारख्या काही राज्यांतील चित्रपटगृहे 'राष्ट्रीय चित्रपट दिना'मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. दरम्यान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह सर्व राज्यांतील सिनेमा राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त विशेष ऑफर देणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post