कळवण :
नाशिक जिल्हा स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2022-23 आयोजित शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने व शक्यता या विषयावर नाशिक येथील गुरू गोविंदसिंग महाविद्यालय येथे जिल्हा स्तरीय स्पर्धेत आर. के. एम. विद्यालयाचा नयन महेश कोष्टी याने प्रथम क्रमांक पटकावला व विभाग स्तरासाठी निवड झाली.
सदर स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धकांनी केलेले सादरीकरण त्यासाठी आवश्यक पी पी टी व त्यावर आधारित तोंडी प्रश्न विचारण्यात आले होते व त्यानंतर लेखी परीक्षा या सर्व बाबीत नयन यशस्वी ठरला.
कळवण एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री. रावसाहेब अमृता शिंदे, उपाध्यक्ष श्री. हर्षवर्धन पवार, सरचिटणीस श्री. भूषण दादा पगार व सर्व विश्वस्त मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. डी. देवरे, उपप्राचार्य श्री. एस. पी. बागुल, उपमुख्याध्यापक श्री. जे. आर. जाधव, पर्यवेक्षक श्री. पी. एम. महाडीक, श्री. डी. जे. पवार यांनी नयन चे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री. व्ही. एन. पिंपलीस्कर, श्री. एस. एल. निंबेकर, श्री. के. एच. खैरनार, श्री. डी. बी. गावित, श्री. व्ही. एस. शिरसाठ, श्रीमती एस. एस. गांगुर्डे, श्रीमती एस. एच. आहेर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले..
Post a Comment