Khandesh Darpan 24x7

फैजपूर येथे संत कबीर व्याख्यानमाला ...!


राज चौधरी 

दि.30/9/2022 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'संत कबीर व्याख्यानमाला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


प्रसंगी प्रमुख वक्ते सचिन परब यांनी संत कबीर यांच्या विषयी माहिती देत असताना सांगितले की संत कबीर यांच्या लेखनाची प्रेरणा संत नामदेव यांच्या कडून मिळाली,कबीर यांचे दोहे संपूर्ण भारत भरच नव्हे तर पाकिस्तानातही प्रसिद्ध आहेत, पंढरीच्या वारीतही संत कबिराची पालखी सहभागी होते, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या ' सत्यशोधक समाजाच्या प्रारंभी कबिराचे दोहे वाचले जात असतं, संत परंपरेतील योगदान लक्षात घेता कबिरांचा सहभाग संत पंचकात होतो, भारतासारख्या विविध जाती, धर्म विविधतेने नटलेल्या देशात सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून संत कबीर लक्षात घेणे गरजेचे आहे असे सचिन परब यांनी सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी ही सामाजिक एकात्मता प्रस्तापित करण्यासाठी संत कबीर यांचे विचार आत्मसात करून आपला विकास साधावा असे सांगितले. 


प्रसंगी डॉ.सुनील पाटील-जनसंपर्क अधिकारी,कबचौ उमवि जळगाव, यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला,प्रास्ताविक  रसेयो प्रमुख- डॉ. दीपक सुर्यवंशी, सूत्रसंचालन डॉ.कल्पना पाटील व आभार डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी मानले, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, डॉ.जगदिश पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह राष्ट्रीय सेवा योजनेतील विध्यर्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post