तुम्हाला माहिती असेल, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ असल्याशिवाय ‘पासपोर्ट’ दिला जात नाही. पासपोर्ट काढताना ‘पीसीसी’ ही एक महत्वाची प्रक्रिया आहे.
निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा, इमिग्रेशनसाठी अर्ज करताना ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ आवश्यक असत - मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे
पहा काय सांगितले परराष्ट्र मंत्रालयाने ?
▪️ पासपोर्टसाठी अनिवार्य असलेल्या ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांना आता ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
▪️ यासाठी मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’ साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️ त्यामुळे पासपोर्ट अर्जदार आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ साठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Post a Comment