मेष (Aries): गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा. निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील.
वृषभ (Taurus): मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल.
मिथुन (Gemini) : लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल. एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील.
कर्क (Cancer) : शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल. एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह (Leo) : कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात. मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या (Virgo) : शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा. विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. दुसऱ्यांच्या लाईफमध्ये डोकावू नका. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन लवकरच होईल.
तुळ (Libra) : हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत. व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या वादात पडू नका.
वृश्चिक (Scorpio) : ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील.
धनु (Sagittarius) : मनात हेतू ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल.
मकर (Capricorn) : माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल. अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. चांगली वागणूक देणे आपला चांगला गुण राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ (Aquarious) : कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील.
मीन (Pisces) : सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील.
Post a Comment