रिक्षा, भाजीवाल्यापासून मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून देवाणघेवाण होते. यामुळे सुट्ट्या पैशांच्या अडचणींपासून सुटका होतेच त्या शिवाय वेळही वाचतो. मात्र अनेकदा इंटरनेटची अडचण येते. त्यामुळे बऱ्याचदा व्यवहार खोळंबतात. मात्र आता गुगल पे, फोन पे, पेटीएम अर्थात (यूपीआय) करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. फोनवरून विना इंटरनेट यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला *99# कोडचा वापर करावा लागले. याला यूएसएसडी सर्व्हिस बोललं जातं. *99# सर्व्हिस वापरूनही यूपीआयाचा फायदा घेऊ शकतो. जे लोक स्मार्ट फोन वापरतात ते अडचण असल्यास या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
जाणून *99# च्या माध्यमातून यूपीआय पेमेंट्स कसे करायचे ? -
- स्मार्टफोनवरील डायल बटण उघडा आणि *99# टाइप करा, त्यानंतर कॉल बटण दाबा
- पॉपअप मेनूमध्ये, तुम्हाला एक संदेश मिळेल ज्यात ७ नवीन पर्याय येतील. १ नंबरवर टॅप केल्यास, पैसे पाठवण्याचा पर्याय येईल. त्यावर टॅप करा.
- ज्या व्यक्तीला पेमेंट करायचे आहे त्याचा नंबर टाइप करा आणि पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा.
- UPI खात्याशी संबंधित मोबाईल नंबर एंटर करा आणि पैसे पाठवा वर टॅप करा.
- तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे ती संख्या अंकात टाका आणि नंतर पैसे पाठवा.
- पॉपअपमध्ये, तुम्हाला पेमेंटचे कारण लिहावे लागेल, तुम्ही पेमेंट का करत आहात. भाडे, कर्ज किंवा खरेदीचे बिल इत्यादी लिहा.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंटसाठी, प्रथम तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि तोच क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला गेला पाहिजे. तुम्ही त्याच नंबरवरून *99# सेवा वापरू शकता. ही *99# सेवा वापरून तुम्ही कोणतीही UPI सेवा वापरू शकता.
Post a Comment