सावदा येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमवारगीरी मढी येथे दि २९ पासून स्वामी निलगिरी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा देखील अखंड हरीनाम श्रीमद भागवत सप्ताह व श्री विष्णू सहस्त्र नाम यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज दि २९ रोजी सकाळी ८ वा भागवत पूजा आरती व कथा आरंभ होणार असून या सप्ताहा दरम्यान दररोज संहिता पाठ व कथा होणार असून संहिता पाठाचे वाचक ह.भ.प. मनोज पुरुषोत्तम पाटील हे असून कथेचे यजमान घनःशाम जगन्नाथ भोरटक्के हे असून, कथेची पूर्णाहुती दि ५ नोव्हेंबर रोजी असून या दिवशी सकाळी ६ वा महाभिषेक विष्णू सहस्त्र नाम यज्ञ, या नंतर ह.भ.प. अनील महाराज कोसगावकर, यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसाद व सायंकाळी ६ ते ९ पर्यंत शहरातून दिंडी सोहळा असे कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमास सावदा व परीसराततील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक महंत श्री कृष्णगीरीजी गुरू कैलासगीरीजी महाराज यांनी केले आहे,
Post a Comment