महाराष्ट्र शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त अन्नधान्याव्यतीरीक्त प्रती शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर १ लिटर तेल या चार शिधाजिन्नसांचा संच ₹ १००/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत सावदा येथे भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून भुषण सुरवाडकर यांच्या रेशनिंग दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष जे के भारंबे, सरचिटणीस संतोष परदेशी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश लोमटे , नितीन भाऊ वाणी, सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान क्र १२ चे संचालक भुषण सुरवाडकर व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.
सदरहु किट मध्ये साखर नसल्याने लोकांची थोडी नाराजी झालेली दिसून आली, ऐन दिवाळी च्या दिवशी तोंड गोड झालेच नाही....
إرسال تعليق