मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर गाड्या सुस्साट धावणार आहेत. कारण शासनाने समृद्धी महामार्गावर गाड्यांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. यासाठी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. गाड्यांसाठी 100-120 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर कमाल 120 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
वाहनांनुसार कशी असेल वेगमर्यादा ?
>> 8 प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 120 किमी/तास वेगमर्यादा.
>> 9 पेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 100 किमी/तास वेगमर्यादा.
>> सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला 80 किमी/तासांची वेगमर्यादा.
>> समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी रिक्षाला परवानगी नाही.
إرسال تعليق