व्हॉट्सअॅप WhatsApp हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. व्हॉट्सअॅप आल्यानं आपली अनेक कामं खूप सोपी झाली आहेत. आज व्हॉट्सअॅपचा वापर व्यवसाय, शिक्षणापासून इतर अनेक क्षेत्रात होत आहे.
यासाठी तुम्हाला Railofy चा नंबर (9881193322) तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करावं लागेल. व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला हा नंबर तुमच्या व्हॉट्सअॅपवर सर्च करावा लागेल. चॅट विंडो उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल आणि तो पाठवावा लागेल.
यानंतर Railofi चॅटबॉट तुमच्या व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ट्रॅव्हल अलर्ट आणि ट्रेन प्रवासाशी संबंधित रिअल टाइम अपडेट्स पाठवेल. याशिवाय प्रवासापूर्वीच तुमचा पीएनआर क्रमांक टाकून तुम्ही प्रवासाशी संबंधित नवीनतम अपडेट्स मिळवू शकता. व्हॉट्सअॅपमुळं आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. त्याचा वाढता वापर पाहता, भारतीय रेल्वेही व्हॉट्सअॅपवर आपल्या अनेक सुविधा देत आहे. अशा परिस्थितीत आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हॉट्सअॅपद्वारे ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि त्यांचे पीएनआर स्टेटस कळू शकणार आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रेनने प्रवास करतानाही ते ट्रॅक करू शकतील.
आतापर्यंत प्रवाशांना ट्रेनशी संबंधित माहिती ट्रॅक करण्यासाठी इतर अॅप डाउनलोड करावे लागत होते. त्यामुळं रेल्वेच्या या सुविधेनंतर त्यांना दुसरं कोणतंही अॅप डाउनलोड करावं लागणार नाही. या सर्वांची माहिती त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे सहज मिळू शकेल. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि अपडेट्स मिळविण्यासाठी काय करावं ते आपण पाहणार आहोत.
चला तर पाहूया व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ट्रेनचं लाईव्ह स्टेटस आणि अपडेट्स भारतीय रेल्वेची ही सुविधा तुम्हाला चॅटबॉटवर मिळते. येथे तुम्ही तुमचा 10 अंकी PNR क्रमांक टाकून थेट ट्रेनची स्थिती, PNR स्थिती, मागील रेल्वे स्थानक माहिती इत्यादी तपासू शकता.
एकदम बढिया
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती वाचायला मिळते या पोर्टल वर
ReplyDeletePost a Comment