Khandesh Darpan 24x7

आता एका वर्षात करता येणार 4 वेळा मतदान नोंदणी -- निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ...

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान नोंदणीसाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. 

यामुळे ज्या नागरिकांचे 18 वर्षे वय येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे त्यांनादेखील आगाऊ नोंदणी करता येणार आहे. 

कोणत्या तारखेला करता येणार नोंदणी ?

येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहिमेंतर्गत ज्या नागरिकांचे वय 17+ असेल असे नागरिक आगाऊ मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जात आहे.

राज्यातील नागरिकांना 31 मे 2023 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे.

आता एका वर्षात 4 वेळा मतदार नोंदणी करता येणार

तुम्हाला माहिती असेल, मतदार नोंदणी करताना यापूर्वी 1 जानेवारी या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वय 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनाच मतदार नोंदणी करता येत होती.  

मात्र आता 2023 पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदान नोंदणी करता येणार , अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم