सावदा शहरात विविध विकास कामासाठी मुक्ताईनगर चे आ. चंद्रकांत पाटील हे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असतांना पुन्हा एकदा त्यांनी सावदा शहरातील चर्मकार व कोष्टी समाजा साठी निधी उपलब्ध करून दिला आहे
सावदा शहरात गेल्या 20 ते 22 वर्षा पासून चर्मकार समाजा साठी समाज मंदिर व्हावे अशी मागणी होती यासाठी शहरातील चर्मकार समाजाचे गजानन नामदेव ठोसरे हे सामाजीक कार्यकर्ते तथा चर्मकार समाजाचे रावेर तालुकाध्यक्ष सातत्याने प्रयत्न करीत होते त्यासाठी त्यांनी मुक्ताईनगर चे आ. चंद्रकांत पाटील यांचे कडे देखील पाठपुरावा केला व आ. पाटील यांनी देखील सदर मागणी कडे लक्ष पूरऊन तातडीने येथील चर्मकार समाज बांधवा साठी समाज मंदीर उभारणी साठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला
याच सोबत शहरातील कोष्टी समाज बांधवाची देखील समाज मंदीरा साठी मागणी होती त्यांचे साठी देखील 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील आणखीन देखील विकास कामा साठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे येत्या काळात सावदा शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असले तरी येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या पालिका निवडणुका लक्षात घेता ही कामे त्वरीत मजूर होऊन निधी उपलब्ध करून त्याचे निविदा काढून कामे मार्गी लागावी अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे
إرسال تعليق