सावदा येथील अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सपोनि (सहाय्यक पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सावदा शहरात एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी केल्यानंतर रूपये १५ हजार देण्याचे ठरले.
दरम्यान, या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे एका पथकाची निर्मिती करून सापळा रचण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी लाच मागणाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वीकारली नाही तथापि, एसीबी पथकाच्या चौकशीत लाच मागितल्याचे सिध्द झाल्याने सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق