हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं रेड अलर्ट; या अवयवांमधून येऊ लागतो जास्त घाम...!
Khandesh Darpan 24x70
खराब जीवनशैली A heart attack आणि आहारामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. आजकाल मुलंही अगदी कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. पण, विज्ञानानुसार हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर अनेक प्रकारचे आपल्याला संकेत (सिग्नल) देते. ज्यातील काही संकेत खूप गंभीर आहेत आणि ते स्पष्टपणे दर्शवतात की, तुम्हाला काही हृदयरोग किंवा इतर समस्या आहेत. यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे जास्त घाम येणे. होय, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात वेगाने घाम येतो, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उन्हामुळे किंवा उष्णतेतून येणारा घाम हा हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी येणाऱ्या घामापेक्षा वेगळा असतो.
कसे, आम्ही तुम्हाला सांगतो. हृदयविकाराच्या झटका येताना येणारा घाम वेगळा कसा असतो? द हेल्थ साईट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, व्यायामानंतर तसेच वेगात शारीरिक हालचाली केल्यानंतर किंवा उन्हामुळे आपल्याला घाम सुटतो तो सर्वसाधारण असतो. पण, जेव्हा हृदय नीट काम करत नाही तेव्हा हा घाम वेगळाच असतो. म्हणजे यादरम्यान सर्वसाधारण घाम येण्याच्या कोणत्याही गोष्टी न करता अचानक शरीराला खूप घाम येऊ लागतो. यासोबतच या काळात शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. जसे की धाप लागणे, मळमळणे, थकवा येणं आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. याशिवाय शरीराच्या अनेक भागातून जास्त घाम येणे सुरू होते. जसे…
– चेहऱ्यावर आणि ओठांच्या आजूबाजूला जास्त घाम येतो
– मानेवर घाम सुटतो.
– कपाळावर घाम येणे. ही इतर लक्षणे शरीरात दिसू शकतात
– हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात इतरही अनेक लक्षणे दिसतात. जसे की श्वासोच्छवासासह छातीत थोडासा जडपणा, फ्लू, रात्री झोप न लागणे आणि झोप लागण्याची भीती. तर अशी सर्व लक्षणे सूचित करतात की तुमचे हृदय योग्यरित्या काम करत नाही आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे लगेच जाणे आणि हृदयाची तपासणी करून घेणे महत्त्वाचे गरजेचे आहे.याशिवाय, तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे. जसे की दररोज 10,000 पावले चालणे, कमी तेलकट अन्न खाणे आणि व्यायामासह सक्रिय जीवनशैलीचे पालन करणे. त्यामुळे शरीरातून येणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या घामाकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळता येईल. वरील अशी काही लक्षणे कोणामध्येही दिसल्यास न घाबरता शांतपणे डॉक्टरांकडे जावे. आपण घाबरलो तर वर-खाली होऊन गुंतागुंती अधिक वाढू शकतात, याची काळजी घ्या.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
إرسال تعليق