Khandesh Darpan 24x7

हिवाळ्यात रोज खा 'हे' फळ, सर्दी होणार नाही ...!




राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसात या गुलाबी थंडीचे रुपांतर कडाक्याच्या थंडीत होईल. अशातच सगळ्यात जास्त त्रास होतो तो सर्दीचा. यावर अनेक उपाय केले जातात. पण बऱ्याचदा या उपायांचा फायदा होईलच असं नसतं. अशातच एक फळ असे आहे याचे रोज सेवन केल्याने सर्दी आटोक्यात येण्यास मदत होते. 


हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते. विरघळणारे फायबर जास्त काळ पोट भरलेले ठेवते ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे वजन नियंत्रणात  राहते. त्यामुळे शरीरातील कॅॅलरीजचे प्रमाण कमी राहते.


हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी-पडसे नेहमीच असते. तर, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते. 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post