बोईंगच्या वेबसाइटनुसार, बोइंग 747 हे विमान सेकंदाला सुमारे 4 लीटर इंधन खर्च करते. म्हणजेच 1 मिनिटाच्या प्रवासात 240 लिटर इंधन खर्च होते. बोईंग 747 हे विमान 1 किलोमीटर साठी सुमारे 12 लिटर इंधन वापरते. म्हणजे 1 लिटरमध्ये हे विमान फक्त 0.8 किमी प्रवास करते. हे विमान 12 तासांच्या प्रवासात 172,800 लिटर इंधन वापरते. बोईंग विमानात सुमारे 500 प्रवासी प्रवास करू शकतात आणि त्याचा सरासरी वेग ताशी 900 किलोमीटर इतका आहे.
आता आपण दुसर्या एका विमानाबद्दल जाणून घेऊ. बोइंग 737-800 हे विमान जगातील विमान कंपन्यांमध्ये सर्वात सामान्यपणे आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे विमान आहे, ते सुमारे 4.88 गॅलन प्रति तास म्हणजे प्रति सीट सुमारे 18.47 लिटर इंधन बर्न करते आणि 515 मैल प्रतितास इतका वेगवान आहे. बहुतेक विमाने प्रति तास 3200 लिटर इंधन वापरतात. याचा अर्थ असा की MD-80 विमानाच्या तुलनेत, बोईंग 737-800 विमान प्रति फ्लाइट US$2,000 सहज वाचवू शकते.
बोईंग 747 विमान हे एक मोठे व्यावसायिक विमान आणि कार्गो वाहतूक विमान आहे, जे जंबो जेट या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. विमानात चार इंजिन आहेत आणि ते प्रवासी, मालवाहू आणि इतर आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहेत. ९ फेब्रुवारी १९६९ रोजी याने पहिले उड्डाण केले. तर आता तुम्हाला हे कळले असेल की विमान 1 लिटरमध्ये किती मायलेज देते.
Post a Comment