जळगाव प्रतिनिधी | किरण तेली
मूळचे खडकदेवळा ता. पाचोरा येथील कवी व पत्रकार प्रकाश तेली यांनी अल्पवयात मतदान जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशंसा केली असून तसे पत्र त्यांनी प्रकाश तेली यांना १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी दिले आहे. तेली यांनी मतदान जनजागृतीसाठी ४०० पेक्षा जास्त घोषवाक्य व १५० च्या जवळपास कविता लिहिलेल्या आहेत हे एक सामाजिक व राष्ट्रीय कार्य असून समाजाला दिशा व मार्गदर्शन करणारे आहे असे ही पालकमंत्री यांच्या पत्रात म्हटले आहे.
तेली यांनी खुप चांगल्या प्रकारे मतदार साक्षरता अभियान चालवल्याचे ही पत्रात नमूद असून प्रकाश तेली यांनी कविता सग्रह आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातुन जे कार्य केले आहे ते अद्भुत असल्याचे ही त्यांनी सांगीतले आहे. याव्यतिरिक्त बालविवाह, सडक सुरक्षा,बालकांचे हक्क, बढती लोकसंख्या, अश्या अनेक ज्वलंत विषयांवर जवळपास ५० कविता सग्रह आहेत, त्यांची दखल महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्री प्रभात लोढा, पद्धमश्री व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे अश्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या या सामाजित कार्याची स्तुती करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment