सावदा येथील एपीआय डी.डी.इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजाराच्या लाचेच्या मागणी करून तडजोडीअंती १५ हजारांची लाच मागितल्याने दोन्ही अधिकार्यांना काल सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
या दरम्यान अधिकारीच अटकल्याने त्यांच्या जागी कोण येणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. अखेर रात्री उशिरापर्यंत एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला असून यांच्याकडे सावदा येथील प्रभार देण्यात आला आहे.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
Post a Comment