शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील इतर सर्व ओबीसी, बहुजन, दुर्लक्षित घटकांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करावा. अशी मागणी व भावना मागील अनेक वर्षापासून अनेकांची होती. वेळोवेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या याबाबत प्रा. मनोहर धोंडे यांच्याकडे भावना व्यक्त केल्या जात होत्या. २०१४ ला नांदेड येथे शिवा संघटनेची पदाधिकारी परिषद घेण्यात आली. या परिषदेला १७०० पदाधिकारी उपस्थित होते. १७०० पैकी १४५० पदाधिकारी यांनी लेखी लिहून दिले होते की, नवीन पक्ष स्थापन करावा. व २३० पदाधिकारी यांनी शिवसेना, भाजप बरोबर जाण्यासाठी लेखी फॉर्म भरून दिले होते. असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भावना नवीन पक्ष स्थापन करण्याची असतानाही आठ वर्षे त्यावर विचार मंथन झाले. ठीक ठिकाणी असंख्य समाज बांधवांनी मोठी स्क्रीन लावून एकत्रितपणे या ऑनलाइन बैठकीत सहभाग घेतला. या मीटिंगमध्ये सहभाग घेतलेल्या अनेकांनी पक्ष स्थापन करावा अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या २८ जानेवारी २०२३ रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटना नवीन पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करणार आहे असे या ठिकाणी जाहीर करण्यात आले.
إرسال تعليق