Khandesh Darpan 24x7

श्री आ. गं. हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे संविधान दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी :  प्रदीप कुळकर्णी राजेश चौधरी

आज २६ नोव्हेबर, २०२२ संविधान दिन. श्री आ. गं. हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे भारताचे आदर्श संविधानाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी  शाळेचे प्राचार्य सी. सी. सपकाळे यांनी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, तसेच पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे यांनी भारताचे "संविधान प्रास्ताविक प्रतिमेचे" पुष्प टाकून पूजन केले व एस. एम. महाजन सर यांचे सोबत विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान प्रतिमेचे वाचन केले त्याच प्रमाणे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर बंधु भगिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान प्रास्ताविक प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी प्राचार्य सी. सी. सपकाळे, एस. एम. महाजन सर तसेच बी. जी. लोखंडे सर यांनी विद्यार्थ्याना संविधाना विषयी  मार्गदर्शन केले .


या वेळी वाय.एन. पाटील, सुरेश मेढे, अनिल नेमाडे, सुनील महाजन, मनीषा भंगाळे, संध्या चौधरी, कल्पना शिरसाठ, अरुण राठोड, प्रा. मनोज महाजन, प्रा. सचिन नागपुरे, प्रा. भारती भंगाळे, प्रणाली काटे, उदय कोळी, बी. ए तेली, भास्कर खंडेराव, अतुल सपकाळे, राजेंद्र जाधव, अमित बेंडाळे, दिलीप काळे, श्रेयस जैन, विश्वास बामणोदकर, रमेश इंगळे, व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post