कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा कुटुंबांची माहिती सरकारने जिल्हा बॅंका, नागरी सहकारी बॅंका व पतसंस्थांकडून मागविली आहे.
राज्यात 40 हजार कुटुंबे --
राज्यात अशी सुमारे 40 हजार कुटुंबे असून, त्यांच्याकडे बॅंका, पतसंस्थांचे कर्ज आहे. त्यासाठी अनेकांनी घर, शेती, जागा, दुकान तारण ठेवलंय. घरातील कर्ता गेल्याने कर्जाची परतफेड करणे, कठीण झालं आहे. दुसरीकडे बॅंकांकडून वसुलीसाठी तगादा सुरु आहे.
राज्य सरकारने अशा कुटुंबांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असल्यास आर्थिक सवलत, तर कर्ज भरण्याची क्षमता नसलेल्या कुटुंबांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार असल्याचे समजते.
बॅंकांनी मंजूर केलेली रक्कम, तारण मालमत्ता, थकीत रक्कम व वसुलीची सद्यस्थिती, याबाबतची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सर्व बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्थांना दिले आहेत.
Post a Comment