Khandesh Darpan 24x7

नार्को टेस्ट म्हणजे काय आणि ती केव्हा केली जाते...!

श्रद्धा वालकर हत्या ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली आहे. अनेक नवनवीन खुलासे या हत्याकांडात होत आहेत. नवनवीन साक्षी पुरावे समोर येत आहेत. या नृशंस हत्येचे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत.

या हत्याकांडाचा एकमेव सुत्रधार आफताब पूनावालाच्या अक्षम्य कृत्यावर पोलिसांकडून शिक्का मोर्तब झालेलेच आहे. पण यात अजून ठोस पुरावे हाती लागत नाहीयेत. त्यामुळे आरोपीची नार्को चाचणी करण्यात येते आहे. काय असते ही नार्को चाचणी? टी कशी करतात..? देशात घडणाऱ्या काही घटना असतील. उदाहरणार्थ बलात्कार, खून, अफरातफर, संबंधित अनेक प्रकरणांचा अधिक तपास करण्यासाठी आरोपीच्या जबाबानंतरही जर पोलीस तपासामध्ये काही उलगडा झाला नाही तर पोलीस प्रशासन नार्को टेस्ट ची मागणी करू शकते.देशात घडणाऱ्या काही मोठ्या महत्वाच्या खटल्यांमध्ये पोलीस आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतात आणि तपासामध्ये नार्को टेस्टमधील काही गोष्टींचा आधार घेतात. असं तेव्हाच केलं जातं जेव्हा मोठया गुन्ह्याखाली एखाद्या आरोपीने जबाब दिला आणि तो जबाब आणि पोलिसांनी केलेला तपास यामध्ये काही परिस्थिती किंवा सापडलेले पुरावे, यांच्यात फरक जाणवला तर त्या आरोपीकडून गुन्ह्याबाबत खरी माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते.

नार्को टेस्ट कशी केली जाते..?

१) एखाद्या आरोपीकडून गुन्ह्याबाबत महत्वाची व खरी माहिती मिळावी, यासाठी धागेदोरे सापडावेत म्हणून नार्को टेस्ट केली जाते. समजा गुन्हेगार किंवा संशयित आरोपीकडून सत्य बाहेर काढायचं असेल तर एखाद्या आरोपात ही टेस्ट खूप मदत करते. महत्वाचं म्हणजे न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणाचीही नार्को टेस्ट करता येत नाही.

२) आरोपीला ‘ट्रुथ सिरम’ नावाचं एक औषध दिले जाते. अनेकदा सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शनदेखील दिलं जातं. हे औषध रक्तात पोहोचताच व्यक्ती अर्धचेतन अवस्थेत पोहोचते. मग उपस्थितांपैकी काही तज्ज्ञ व्यक्ती जसे की डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञ व पोलिस या केससंदर्भात आरोपीला प्रश्न विचारून सत्य बाहेर काढतात. यामध्ये आरोपीच्या शरीराच्या हालचालींवर, हावभावांवर देखील लक्ष ठेवले जाते.

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post