Khandesh Darpan 24x7

पत्रकारांच्या लेखणीत दम व बातमीत धमक असायला हवी -जेष्ठ पत्रकार - राजीव बोरसे




पत्रकार संरक्षण समिती मेळाव्यात ५५ पत्रकारांना ओळखपत्र नियुक्तीचे पत्र प्रदान 


सावदा प्रतिनिधी | राजेश चौधरी


शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुका व ग्रामीण कार्यकारिणी चा पदाधिकारी सदस्य पदनियुक्तीपत्र ओळखपत्र वाटपसह स्नेहमेळावा, स्नेहभोजन मेळावा निंभोरा ता. रावेर येथील कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय येथे शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोद जी पत्रे साहेब यांचे आदेशान्वये जळगांव जिल्हाध्यक्ष सन्माननीय आत्मारामजी गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष राजु तडवी, रावेर तालुकाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी, ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप महाराज पंजाबी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संतोष कासोदे, भुसावळ तालुकाध्यक्ष राजेश निकम, सुमित निकम, राजु पाटील उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी पत्रकारिता निस्वार्थ आणि निष्कलंक असायला हवी. पत्रकारिता भयमुक्त असावी पत्रकारांच्या लेखणीत दम व बातमीत धमक असायला हवी जेणेकरून पत्रकारितेचा जरब बसतो असे ते म्हणाले तसेच जेष्ठ पत्रकार गुणवंत पाटील, मुबारक तडवी , प्रदीप महाराज, इंद्रीस शेख, विकास अवसरमल, फरीद शेख आदींनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक अनिल आसेकर यांनी केले. यावेळी रावेर तालुका उपाध्यक्ष राजू पाटील, मिलिंद कोरे, उत्तम वाघ, शाकीर मलीक, विनोद कोळी, भिमराव कोचूरे, विनायक जहूरे, युसुफ शाह रावेर ग्रामीण प्रसिद्धीप्रमुख परमानंद शेलोडे ,सुमित निकम,राजेश निकम,अनिल इंगळे ,योगेंद्र भालेराव, आशीष चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकांत वैदकर, गोकुळ कोळी ,चेतन पाटील, प्रकाश पाटील,ईश्वर महाजन,राहुल जैन, पुरुषोत्तम संघपाल,शेख फरीद भाई, मोसीन खान, भागवत पाटील, पूनमचंद जाधव, मगनसिंग पवार, ईश्वर महाजन. संतोष परदेशी, नजीर शेख, तुषारसिंग परदेशी, राजेश चौधरी (राज सर) आदींसह बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post