Khandesh Darpan 24x7

आता स्कूटरमध्येही मिळणार ‘एअरबॅग्ज’, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा…!!


रस्ते अपघातात होणारी जीवित हानी टाळण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वाहतूक नियम कडक करण्यात आले आहेत. दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. वाहनांमधील ‘सेफ्टी फीचर्स’ सातत्याने अपग्रेड केली जात आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व कारमध्ये किमान 6 एअरबॅग्ज देण्याचा नियम अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अपघातात बळी जाणाऱ्यांमध्ये बहुतांश दुचाकीस्वारच असतात. ही बाब लक्षात आल्यानंतर होंडा कंपनीने नुकतीच मोठी घोषणा केली आहे.

स्कूटरलाही एअरबॅग -

भारतातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटर्सने (Honda Motors) दुचाकीचालकांच्या सुरक्षेसाठी लवकरच स्कूटरमध्येही एअरबॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा कंपनी लवकरच एअरबॅग्ज (Airbag In Scooter) असलेली स्कूटर बाजारात आणणार आहे. त्यासाठी कंपनीने स्कूटरमधील या फीचर्सचा पेटंट घेण्यासाठी अर्ज केल्याचीही माहिती मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून होंडा कंपनी या प्रणालीवर काम करीत आहे. सध्या कारमध्ये बसवल्या जाणाऱ्या सिस्टीमपेक्षा स्कूटरमध्ये वापरली जाणारी यंत्रणा वेगळी असेल. मात्र, कारमधील प्रणालीप्रमाणेच स्कूटरमध्येही ही यंत्रणा काम करील.

स्कूटरमध्ये हँडलच्या मध्यभागी एअरबॅग ठेवली जाईल, जी स्कूटरच्या पुढील बाजूस बसवलेल्या एक्सेलेरोमीटरला जोडली जाईल. अपघातानंतर ही एअरबॅग्ज उघडली जाईल. होंडा कंपनीने 2009 मध्येच थायलंड व जपानमधून ‘होंडा पीसीएक्स’ (Honda PCX) स्कूटर लॉन्च केली आहे.

भारतात 2023 पर्यंत ही स्कूटर लाॅंच केली जाऊ शकते. एअरबॅग असणारी स्कूटर बाजारात आणण्यासाठी होंडाने ‘पेटंट’साठी अर्ज केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ‘पीसीएक्स’ स्कूटरला एअरबॅग फीचरने सुसज्ज करून लॉन्च केले जाईल. भारतात असे फीचर आणणारी ही पहिली कंपनी ठरणार आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم