Khandesh Darpan 24x7

सरकारचा आदेश 1 जानेवारी 2023 पासून इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स होणार बंद...!

खान्देश दर्पण 24x7 वृतसेवा :


देशातील बहुतेक राज्यात आता थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात देशातील अनेक राज्यात थंडी आणखी वाढणार आहे. तर दुसरीकडे लोकांनी वॉटर हीटर्सचा वापरही सुरू केला आहे.


यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील नवीन वॉटर हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडा थांबा. वॉटर हीटर्सबाबतीत सरकार ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सरकारने एक मोठा निर्णय घेत नवीन वर्षात 1 जानेवारी 2023 पासून 1 स्टार रेटिंगसह येणारे सर्व वॉटर हीटर्स बंद केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.


ऊर्जा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. म्हणेजच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून 1 स्टार वॉटर हीटर्स खरेदी करता येणार नाही.


जारी केलेल्या अधिसूचनेत एक तक्ताही देण्यात आला आहे. यामध्ये स्टार रेटिंग प्लॅनसह येणाऱ्या वॉटर हीटर्सची माहिती देण्यात आली आहे. त्यांची वैधता या तक्त्यामध्ये दिली आहे. ही वैधता 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल.


स्टोरेज असलेले इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स वैध नसतील. 6 लीटर ते 200 लीटर स्टोरेज असलेले आणि 1 स्टार रेटिंग असलेले वॉटर हीटर्स बंद केले जात आहेत. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की ज्या इलेक्ट्रिक वॉटर हीटर्समध्ये असा स्टोरेज आहे त्यांना अपग्रेड करणे आवश्यक आहे. त्यांच्या उर्जा कार्यक्षमतेची पातळी सुधारण्याची आवश्यकता आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post