Khandesh Darpan 24x7

चिंता वाढली! राज्यात 'या' दोन शहरात सर्वाधिक करोनाचे सक्रिय रुग्ण



 महाराष्ट्र दर्पण 24x7 वृत्तसेवा - 


Coronavirus Alert : देशात एका वर्षानंतर पुन्हा एकदा करोना निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनसह जगातील अन्य देशात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातील राज्ये देखील अलर्ट झाली आहेत.


हायलाइट्स:

  • राज्यात सर्वाधिक करोनाचे सक्रिय रुग्ण मुंबई आणि पुण्यात
  • योग्य त्या खबरदारीसाठी प्रशासनाकडून आवाहन
  • ठिकठिकाणी मंदिरात मास्क सक्ती


करोनाच्या नवीन व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे. याचीच धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून करोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय आहेत तर पुण्यामध्ये ४६ करोना रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रासह भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आव्हान केले जात आहे.



करोना पुन्हा डोकं वर काढत असताना राज्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आणि सॅनिटायझर सोबत ठेवण्याचा आवाहन केलं जात आहे. ठिकठिकाणी मंदिर प्रशासन देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मास्क वापरण्याचं आव्हान करत आहे. विमानतळावर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचसोबत बूस्टर डोस ज्या नागरिकांचा घ्यायचा राहिला आहे त्यांना देखील आपले डोस पूर्ण करण्याचं आव्हान करण्यात येत आहे.


चीनमध्ये करोना व्हायरसचा जन्म झाला आणि तो सगळीकडे पसरला. सगळ्या जगाला करोनामुळे लॉकडाऊनला समोरे जावे लागले होते. मात्र, आता करोनाचा नवीन व्हेरियंट पुन्हा धुमाकूळ घालत आहे. 



महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईमध्ये याचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून देशासाठी ही मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. कोरोनाची आकडेवारी पाहता खबरदारी घेतली असतानाही पुन्हा एकदा देशात मास्क सक्ती किंवा अन्य काही काळजी घेण्याची गरज असेल का? ते येत्या काही दिवसांत आणि या आकडेवारीतून समोर येईल.


चीनसह अन्य अनेक देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने  कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांचे रॅडम सॅपलिंग सुरू केले जाणार आहे.

 




 




जर करोना पॉझिटिव्ह आले तर त्याचे नियमांचे पालन करावे लागेल. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. सध्या कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत पण बचावासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या लोकांना आधीपासून काही आजार आहेत त्यांनी नियमांचे पालन करावे असे म्हटले आहे. आरोग्य मंत्रालय प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेणार आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم