Khandesh Darpan 24x7

मैत्री फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख विद्यालयात लोक सहभागातून माझी शाळा माझे उपक्रम : विविध प्रकारचे शालेय उपयुक्त साहित्य वाटप



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे सांस्कृतिक समितीच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मैत्री फाऊंडेशन मुंबई यांच्याकडून शाळेला 02 कॉम्प्युटर, 01 लॅपटॉप, 03 फॅन, डी.व्ही. आर. युनिट सह 04 सीसीटीव्ही कॅमेरे, खेळाचे साहित्य, शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. मैत्री फाउंडेशन हे सामाजिक कार्यकर्ते तथा ऑप्टिक कॉम्प्युटर भुसावळ चे संचालक तसेच शाळेचे माजी सचिव दिनेश पाटील यांचे मित्र परिवाराचे असून त्यांच्या माध्यामातून अश्या प्रकारची मदत मिळत असते.


या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी प्रमोद देविदास पाटील मुळगाव चूनवाडे (पी. डी. पाटील) ऑडिटर यावल ह. मू. भुसावल यांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची प्रति तास 200 लिटर क्षमता असलेले मोठे वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवून देणार असे आश्वासन देऊन विजय भंगाळे यांना 50 हजार रुपये देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सुधीर तांबे यांचेकडून एक कॉम्प्युटर मिळाले. त्याचप्रमाणे माजी कामगार नेते तुकाराम रावजी चौधरी जळगाव, यांचे कडून 06 खुर्च्या,  सुधाकर काशिनाथ सपकाळे (एस. के. सपकाळे) सर चूनवाडे यांचे कडून 05 खुर्च्या,  सेवानिवृत्त आनंदा लोटू चौधरी (कोळी) मांगीकर ह. मु. कल्याण उपमहाप्रबंधक एम.टी.एन.एल. यांचे कडून 10 खुर्च्या,  भेट म्हणून मिळाल्या.

हा कार्यक्रम सोहळा दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण संस्थेचे अध्यक्ष रावेर चे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे प्रेरणेतून तथा अनुमतीने पुढे आला.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण चे सचिव हेमंतराव एकनाथराव चौधरी (हेमंत शेठ, अट्रावल) हे होते. या दानशूर उपक्रमाचे त्यांनी कौतुकपर अभिनंदन केले.


प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए.प्रा.दिनेश राठी सर, वाटर प्युरिफायरचे दाते सी.ए.पी. डी. पाटील, मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाऊ, अनिल पाटील अध्यक्ष नाशिक, रमाकांत चौक सेक्रेटरी, सौ लीना पाचपांडे खजिनदार, महेश सोनार डायरेक्टर ग्लोबल डाटा, सदस्य महेश राऊळ,  उमाकांत वसंत बाऊस्कर अध्यक्ष थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण , टी. आर .चौधरी माजी कामगार नेते,  हे होते.


कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय आर .पी. चौधरी सर यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले.


याप्रसंगी संस्थेचे सहसचिव रामरावदादा माधवराव देशमुख, प्रमोददादा बळवंत पाटील, रमेशराव देशमुख, सूर्यकांत रघुनाथराव पाटील,  इतर दाते सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाऊ, दि एज्युकेशन सोसायटी संस्थेचे माजी सचिव दिनेश भागवतराव पाटील त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले.


पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष प्रकाश राणे यांचे सह सर्व संस्कृतिक समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.



प्रसंगी उपस्थित पंकज प्रकाश पाटील मुळगाव थोरगव्हाण ह. मु. पुणे यांनी त्यांचे वडील स्व. प्रकाश सोपान पाटील यांच्या स्मरणार्थ 5 हजार रुपयांची रोख देणगी दिली. त्याचप्रमाणे गजनान पवार यांनी दहावीत प्रथम येणाऱ्यास 1 हजार रुपयाचे पारितोषिक जाहीर केले.


प्रास्ताविक पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख वाय जे कुरकुरे यांनी केले, तर आभार के. पी. चौधरी यांनी मानले. गावातील तसेच पंचक्रोशीतील पालक यांच्यावतीने या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post