नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 6 दिवस राहिले आहेत. जगभर 31 डिसेंबर अर्थात ‘थर्टी फर्स्ट’ मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. नववर्षाच्या स्वागतानिमित्त रात्री उशिरापर्यंत खाणे-पिणे नि नाचगाणे, तसेच पार्ट्यांना रंग चढलेला असतो. नववर्षाच्या जल्लोषात आनंद साजरा करताना, सारे बेधुंद झालेले असतात.
नववर्षाची तयारी सुरु असतानाच, दुसरीकडे ख्रिसमस सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. या काळात तळीरामांची चंगळ सुरु असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने अशा तळीरामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मद्यप्रेमींसाठी खुशखबर…
यंदा नववर्षाच्या स्वागतानिमित्त ‘थर्टी फर्स्ट’, तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही खुशखबर जाहीर केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या घोषणेनुसार राज्यातील दारुची दुकाने 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. इतर वेळी रात्री 11 वाजेपर्यंतच दारुची दुकाने खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे. मात्र, या दोन खास दिवसांनिमित्त राज्य सरकारने दारुची दुकाने तीन दिवस (रात्र) उशिरापर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment