प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फैजपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय साकेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ता. प. वि. मं. चे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, युवानेते धनंजय चौधरी, सर्व उपप्रचार्य उपस्थित होते.
महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि किमान कौशल्याच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकूण १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रक्तदान करून केली.
महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.पल्लवी भंगाळे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी, रासेयो, छात्रसेनेचे स्वयंसेवक यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. नितीन भारंबे व त्यांचे सहकारी यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
إرسال تعليق