Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालयात धनुर्विद्या आंतर विभागीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन



प्रतिनिधी :  प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी


येथील धनाजी नाना महाविद्यालय, फजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत धनुर्विद्या आंतर विभागीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाऊंड राऊंड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर हे उपस्थितीत होते. प्रमुख उपस्थितीत जीमखाना समिती चेअरमन प्रा. डाॅ. सतीश चौधरी सर, प्रा. किशोर वाघ, प्रा. डाॅ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील, प्रा. डाॅ. भरत चालसे, प्रा. डाॅ. अरविंद कांबळे, प्रा. डाॅ. दिनेश तांदळे, प्रा. डाॅ. चाँद खा सर, प्रा. डाॅ. नवनित असी, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डाॅ. चित्ते सर, प्रा. डॉ. अमोल पाटील, प्रा. क्रांती  क्षीरसागर आदि उपस्थित होते. 

स्पर्धेत जळगाव, एरंडोल आणि नंदुरबार विभागातील संघानी सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी धनुर्विद्या खेळाचा इतिहास सांगितला. धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून भारतात चालु असलेला क्रीडा प्रकार आहे. आधुनिक युगात धनुर्विद्या सारख्या खेळातून विद्यार्थ्यांना मनाला एकाग्र करून निश्चित धेय्य भेदण्याचे कार्य या खेळातून साध्य केले जाते. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी हा क्रीडा प्रकार खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे. कारण या खेळात यश प्राप्त करण्यासाठी निश्चित धेय्य ठरवावे लागते नंतर ते साध्य करण्यासाठी मनाला एकाग्र करून लक्ष भेद करून विजेतेपद प्राप्त केले जाते. विद्यार्थाने जीवनात यशस्वी होण्यासाठी धेय्य निश्चित करून नियमीत प्रयत्न केले तर नक्किच यशस्वी होता येते हे सांगितले. या सोबतच सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपलेराज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले तसेच सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 



धनुर्विद्या पुरूष व महिला क्रीडा प्रकारात जळगाव विभाग विजयी तर एरंडोल विभाग उपविजयी आणि पुरुष प्रकारात नंदुरबार विभाग तृतीय स्थानी राहिले. 


स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन चे सचिव रायमल भिलाला यांनी काम पाहिले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. सतिश चौधरी सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. वंदना बोरोले, प्रा. शिवाजी मगर, प्रा. नहिदा कुरेशी, प्रा. डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. दिलीप बोदडे, प्रा. तिलोत्तमा चौधरी, प्रा. अर्चना वराडे आणि राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم