Khandesh Darpan 24x7

सनातन धर्मातील सर्व संप्रदायांच्या अमृतमंथनाचा समरसता महाकुंभ उदयापासून : भाग १





प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सनातन धर्मातील सर्व संप्रदायांच्या अमृत मंथनाचा समरसता महाकुंभ उदया दि. २९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे आयोजित करण्यात आला आहे. 


हा समरसता महाकुंभ आयोजित करण्यामागे सात मुख्य हेतू आहेत. 


👉 सतपंथ मंदिर संस्थान फैजपुरचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव, 

👉 अखिल भारतीय संत संमेलन फैजपूरचा दशाब्दी महोत्सव, 

👉 महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा साधूदीक्षा रौप्य महोत्सव, 

👉 श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव, 

👉 परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांची २१ वी पुण्यतिथी, 

👉 तुलसी हेल्थ केअर सेंटरचा लोकार्पण समारंभ आणि 

👉 श्री जगन्नाथ गौशाला भूमिपूजनाचा समारंभ 


अशा सात कारणांच्या निमित्ताने हा समरसता महाकुंभ श्री निष्कलंकी नारायण भगवान यांच्या कृपाशीर्वादाने व सतपंथ मंदिराचे बारावे गादीपती महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे.



समरसता महाकुंभात होणार श्री जगन्नाथ गौशाळेचे भूमिपूजन


श्री सतपंथ मंदिराचे अकरावे गादीपती परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री जगन्नाथ गौशालेचे भूमिपूजन दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित समरसता महाकुंभाचे निमित्त संतमहंतांच्या हस्ते वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम परिसरात होणार आहे.




अध्यात्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाईच्या दुधाचा, गोमुत्राचा व शेणाचा वापर देखील दैनंदिन जीवनात केला जातो. गोमूत्र एक उत्तम औषधी असल्याचेही अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. 


गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या तर अनेकांतर्फे गायींना मोकळे सोडून दिले जाते अथवा गोशाळेत दान दिले जाते. अशा गायींवर उपचार करणे व त्यांचे पालनपोषण करणे यासाठी फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ गौशाला उभारण्यात येणार आहे. 



सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभात सतपंथ मंदिराच्या अकरावे गादीपती गुरूदेव श्री जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री जगन्नाथ गौशाळा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे. 


भविष्यात गायींचे पालनपोषण आणि गायींची निगा राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री जगन्नाथ गौशाळेच्या माध्यमातून सर्व सुखसोयींनी उपलब्ध करून दिले जाणार आहे.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post