प्रतिनिधी : प्रदीप कुळकर्णी | राजेश चौधरी
आज दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी सावदा शहरातील पथ विक्रेते बांधवांना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान व पंतप्रधान आत्मनिर्भय योजना यांचे माध्यमातून वेडिंग प्रमाणपत्रा चे वाटप करण्यात आले.
या योजनेअंतर्गत शहरात जे लहान तसेच तात्पुरत्या स्वरूपात स्थिर तसेच शहरात फिरून जे नागरिक वस्तू व सेवांची विक्री करतात अशा नागरिकांना नगरपरिषदेच्या साह्याने 258 लाभार्थ्यांचे दहा हजार रुपये कर्जाची वितरण करण्यात आले होते. या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली अशा लाभार्थ्यांना पुन्हा वीस हजाराचे रुपये कर्ज मिळाले तसेच वीस हजार रुपयाची कर्जाची नियमितपणे परतफेड केल्यानंतर हे लाभार्थी पन्नास हजार रुपये कर्जासाठी सुद्धा पात्र होत आहेत या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांचे मार्फत परिचय बोर्ड व शुभेच्छापत्र पाठवण्यात आलेले आहे याचे वाटप माननीय मुख्याधिकारी किशोर चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरपरिषदेच्या लेखापरीक्षक भारती पाटील मॅडम सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील तसेच महेश इंगळे समुदाय संघटक व इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment