Khandesh Darpan 24x7

टीसी नसला, तरी विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय..



राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


टीसी.. अर्थात शाळा स्थलांतर प्रमाणपत्र नसले, तरी शालेय विद्यार्थ्यांना शाळा-विद्यालयात प्रवेश घेता येणार आहेत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ व्हावेत, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गात, तसेच नववी व दहावीच्या वर्गात अन्य शाळेतील विद्यार्थ्यास प्रवेश घ्यायचा असेल, तर टीसीअभावी त्याचा प्रवेश थांबवता येणार नाही.




*वयानुसार वर्गात प्रवेश मिळेल*


मंत्री केसरकर म्हणाले, की ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार, शाळाप्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्याची तरतूद आहे.'


जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरुन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.


विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर, त्याची 'सरल' पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करावी. जुन्या शाळेला सात दिवसात विनंती मान्य करावी लागेल, अन्यथा संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم