Khandesh Darpan 24x7

समरसता महाकुंभात कोरोनाचे नियमांचे पालन करत सहभागी व्हा - परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


दिनांक २९, ३० आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी वढोदा (फैजपूर) येथील निष्कलंक धाम येथे होणाऱ्या समरसता महाकुंभ कार्यक्रमास देश विदेशातील थोर संत महंतांसह हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत होणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खरबरदारी घेण्यात येणार आहे.


यासाठी ३५०० स्वयंसेवक, खाजगी सेक्युरिटी गार्ड, नियमित पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. कोणताही अघटीत व अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्णपणे खबरदारी घेण्याचे नियोजन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यात रुग्णसेवेसाठी डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, ठिकठिकाणी स्वच्छतागृह, दिवसभरात सकाळी चहा, नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन व्यवस्था, भाविकांना येण्या - जाण्यासाठी ठीक ठिकाणाहून रिक्षा तसेच महाराष्ट्र शासनाच्या बसेसही उपलब्ध असल्याने येणाऱ्या भाविकांनी कार्यक्रमाचा यथेच्छ लाभ घ्यावा.



या ठिकाणी येताना आपल्या सोबत सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने, पॉकेट, पैसे, मोबाईल आदी वस्तू  आणू नये. व प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करावे मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व श्री राधे राधे बाबा यांनी केले आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post