प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दि. ०३/१२/२०२२ तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी. आर.चौधरी होते. याप्रसंगी प्रास्ताविकात डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरींच्या लेवागण बोलीतील योगदाना बद्दल माहिती दिली प्र.के.अत्रे यांनी बहिणाबाई चौधरींच्या कविता बावनकशी सोने आहे, खान्देशी बोली बहिणाबाई चौधरींच्या कविता रूपाने महाराष्ट्रच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचली या कथनाची आठवण करून दिली. मा. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कवितेमुळे लेवागण बोलीस सन्मान प्राप्त झाला, त्यांच्या नावाचा लौकिक पाहूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्यात आले यातच त्यांच्या कार्याची ओळख होते. त्यांच्या कवितेतून अखिल मानव जातीच्या कल्याणाचे, समानतेचे आणि वास्तवतेचे दर्शन घडते. प्रासंगी उप प्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.विलास बोरोले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.वंदना बोरोले, डॉ.सतीश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक विद्यार्थी, राष्ट्रीय सण मोहित्सव समितीचे सदस्य, बी.बी.ए. बी.सी ए. चे विद्यार्थी यांनी सहकार्य केले, प्रास्ताविक डॉ.एस.एल. बिऱ्हाडे यांनी तर सूत्र संचालन व आभार डॉ. मारोती जाधव यांनी मानले.
Post a Comment