खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर भाविकांना तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचं असेल तर स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे तिकीट बूक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या दर्शनाच्या एका तिकिटाची किंमत 300 रुपये ठेवण्यात आली आहे.
दरम्यान तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असाल लगेचच बुकिंग करा. कारण आजपासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली आहे. भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या भक्तांसाठी 300 रुपये किंमतीचे ऑनलाईन कोटा विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटे जारी करण्यात येतील. हे तिकीट 12 जानेवारी ते 31 जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी असेल.
या प्रकारे तिकीट बुक करू शकता --
* यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तिरुपती बालाजीच्या अधिकृत वेबसाइट tirupatibalaji.ap.gov.in ला भेट द्यावी लागेल.
* तुम्ही या वेबसाइटवर जाताच तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधी स्वतःची नोंदणी करावी लागेल.
* याशिवाय, जर तुम्ही स्वतःची नोंदणी केली असेल, तर तुम्ही सहज लॉग इन करू शकता.
* यानंतर, जे होम पेज येईल, तुम्हाला स्पेशल एंट्री दर्शन हा पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
* या ऑप्शनवर क्लिक करताच पुन्हा एक नवीन पेज तुमच्या समोर उघडेल.
* या पेजवर तुम्हाला काही विशिष्ट माहिती द्यावी लागेल, ज्या अंतर्गत तुम्हाला तिकीट बुक करण्याची वेळ आणि भेट देण्याची वेळ देखील टाकावी लागेल.
* यानंतर, एक कॅलेंडर तुमच्या समोर येईल, ज्यामुळे बुकिंग पूर्ण केलेल्या सर्व तारखा पाहू शकता.
* आपण त्यानुसार इच्छित तारीख निवडून वेळ निवडू शकता.
* तुम्ही सिलेक्ट करताच तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज दिसेल जिथे तुम्ही तिकीट बुक करू शकता, यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक मानले जाते.
* तुम्ही सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या समोर Next चे बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, तुम्ही दिलेल्या तिकिटांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, जे तुम्ही UPI ID द्वारे सहज करू शकता.
* तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इतर कोणताही मार्ग अवलंबायचा असेल, तर ते तुमच्यासाठीही उपलब्ध आहे, ज्या अंतर्गत तुम्ही ऑनलाइन असताना तिकीट बुक करू शकता.
Post a Comment