Khandesh Darpan 24x7

सामूहिक विठल नामजप महोत्सव निमित्त महाकाय रांगोळी...!


प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी 


सामूहिक विठ्ठल नाम जप व नाम संकीर्तन  फैजपूर येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती च्या वतीने सप्ताह निमित्ताने भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली व्यासपीठ व स्थापना येथे फुल सजावट चे नियोजन रात्री करण्यात आले, सदर रांगोळी साठी चित्रकार कला शिक्षक राजू साळी, खिलेश दालवाले, सौरभ कोळी, साक्षी पाटील, हेमांगी चौधरी,मंजू पाटील,धारेश बोरोले, लक्ष्मण साळी तसेच परदेशी महिला मंडळ या सर्वानी अथांग प्रयत्न केले, या महाकाय रांगोळी साठी 80 किलो रांगोळी, 1 किंटोल फुलांच्या पाकळ्या, 30 किलो लाकडाचा भुसा वापरण्यात आला, एकूण 3 रांगोळी काढण्यात आल्यात, तिघ ही रांगोळी या 30 × 30 च्या आहेत, सदर तिघ रांगोळीस  10 तास एवढा कालावधी लागला,व्यासपीठ व स्थापना येथे फुल सजावट चे नियोजन रात्री करण्यात आले, 


          रांगोळी सम्पन्न झाल्या नंतर कला शिक्षक राजू साळी सर आणि ग्रुप यांची मुलाखत घेण्यात आली त्या वेळी राजू साळी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले कि आदरणीय दादा साहेब ह. भ. प नरेंद्र भाऊ नारखेडे यांच्या सकल्पनेतून भव्य दिव्य नाम जप सोहळा असून या साठी आमच्या ग्रुप ने महाकाय रांगोळी चे आयोजन केलेले असून आज वर फैजपूर शहरात झालेल्या धार्मिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांध्ये अशा महाकाय रांगोळी चे आयोजन आज वर झालेले नव्हते परंतु या समिती च्या वतीने आम्हा कलावन्ताना व कलेला वाव देण्यात आला म्हणून आम्ही भव्य दिव्य रांगोळी  काढण्याची संधी मिळाली, आणि ही संधी ऐतिहासिक फैजपूर शहरासं ती एक परवणी ठरत आहे, ह्या वर साक्षी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले कि रांगोळी ही एक कला संस्कृती चे प्रदर्शन असून ती लक्ष्मी व समृद्धी चे प्रतीक असते त्यानंतर संपूर्ण टीम ने आयोजक समिती चे आभार मानले,

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post