Khandesh Darpan 24x7

ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा यांचा स्मृतिदिवस



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


संपूर्ण जगात विश्वशांती दिवस म्हणून साजरा .. जगभरती संपूर्ण सेवा केंद्रात एक समान कार्यक्रमाचे आयोजन



जागतिक शांती, सदभावना, सदाचार आणि मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी ज्यांनी मानवमात्रांचा संदेश दिला असे ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा यांचा स्मृतिदिवस संपूर्ण जगात विश्वशांती दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. 


जगात विविध देशांमध्ये सध्या होत असलेली साम्राज्यविस्तार स्पर्धा किंवा आणखी काही देशांमधील सातत्याने होत असलेली कुरघोडी, क्षेपणास्त्रांवरील होत असलेला वाढता खर्च आणि हिंसाचाराचे बदलते स्वरुप पाहता जागतिक पातळीवरील शांतीकरीता कोण पुढाकार घेणार हा यक्षप्रश्न आहे. 


या सर्वांचे मुळ आहे मानव. समाजाच्या वाढत असलेल्या लोभ, लालच, क्रोध, अहंकार आदि दुर्गुणात  जागतिक शांतता हा काही बाह्य घटक नाही तर जगातील प्रत्येक मानव मात्रांच्या ठायी असलेली शांती आहे. 


ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयातर्फे विश्व शांतीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लाखो साधकांचे प्रेरणास्थान प्रजापिता ब्रह्मा यांची शिकवण याप्रसंगी फार मोठे कार्य करीत आहे. 


पुरुष प्रमुख संस्कृतीत कुटुंबातील कर्ती स्त्रीला प्रमुख अधिकार देण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्याचे काम ब्रह्माबाबांनी केले व बहिणींमातांच्या हातील जगातील विशाल आध्यात्मिक संस्थेचे नेतृत्व दिले. 


ब्रह्माकुमारीज् स्थानिक सेवाकेंद्रात विशेष माँनवत आणि गहन योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. 


संपूर्ण जगात एकाच वेळेस जागतिक शांतीसाठी विशेष संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका बी. के. सिंधू दीदी यांनी दिली आहे.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post