प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथे चॉंदनी चौकात पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि.१८ जानेवारी रोजी दुपारी न.पा.उर्दु व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की,या कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराचे पवित्र नावाने करण्यात आली.यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक शब्बीर हुसैन हाजी अख्तर हुसैन उर्फ (बाबू सेठ) हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून सावदा पोलिस स्टेशनचे ए पी आय जलींदर पळे, मा.नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे, डॉ.शेख हारून शेख इक्बाल अध्यक्ष डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रदिप महाराज पंजाबी रावेर ग्रामीण पत्रकार समिती अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार शाम पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील न.पा.उर्दु व मराठी मुलां/मुलींची शाळेतील विद्यार्थ्यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज माहिती व तंत्रज्ञानाचे युग असून जिवनात शिक्षणचे काय महत्त्व आहे. आणि ते कीती आवश्यक असते हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच असे छोटेखानी कार्यक्रमातून चांगला एक संदेश जात असून हा कार्यक्रम आयोजित करणारे पत्रकार युसूफ शाह, दिलीप चांदेलकर, फरीद शेख व मोहसिन शाह यांच्यावर देखील कौतुकाचा वर्षाव केला.
याप्रसंगी डॉ.अनसार, सादिक मिस्त्री, गजानन ठोसरे, पिंटू धांडे, डॉ.रईस, सलिम कुरैशी, आमद हाजी, अय्युब सर, शिवसेना शहर सचिव शरद भारंबे, हापुड गोल्डनचे मालक सादीक सेठ, रावेर ग्रामीण पत्रकार समिती प्रसिद्धी प्रमुख परमानंद शेलोडे निंभोरा, शौकत खान, नाजीम शेख, कामील मेंबर, इरफान खान उर्फ (केजरीवाल), पत्रकार साजीद शेख, न.पा.उर्दु शाळेचे मुख्याध्यापक साबीर जनाब, शिक्षक इमरान जनाब, इरफान जनाब, मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजय नेमाडे, शिक्षक मिलिंद सुरवाडे, गोपनीय विभागाचे पोलिस देवेंद्र पाटील सह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लम खान गुलाम गौस खान जनाब यांनी व आभार पत्रकार फरीद शेख यांनी व्यक्त केले.
Post a Comment