प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
येथील धनाजी नाना महाविद्यालयात व्दितीय वर्ष एम. एस्सी. वर्गात शिकत असलेला मनिष कैलास महाजन याने नुकत्याच रावेर येथे संपन्न झालेल्या खुल्या राज्यस्तरीय भारतोलन स्पर्धेत ९६ किलो वजन गटात खेळत स्नॅच प्रकारात १२८ किलो व क्लिन अँड जर्क प्रकारात १५७ किलो असे एकूण २८५ किलो वजन ऊचलून गटात कांस्यपदक प्राप्त केले.
मनिष महाजन याने महाराष्ट्र शासनाव्दारा आयोजित पुणे येथे संपन्न झालेल्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय भारतोलन स्पर्धेत ९६ किलो वजन गटात खेळत स्नॅच प्रकारात १२६ किलो व क्लिन अँड जर्क प्रकारात १५४ किलो असे एकूण २८० किलो वजन ऊचलून गटात रौप्यपदक प्राप्त केले.
मनिष महाजन यांच्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा मधुकरराव चौधरी- आमदार रावेर-यावल परिसर तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment