Khandesh Darpan 24x7

रासेयो शिबिरात पुढील गोष्टी साध्य होतात-: गणेश पाटील (वकील मुंबई हायकोर्ट)


प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


दि. २४ जानेवारी २०२३ रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर रासेयो (राष्ट्रीय सेवा योजनाविभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी मुंबई हायकोर्टाचे वकील, ८ उद्योगांचे उद्योजक व माजी रासेयो स्वयं स्वयंसेवक यांनी केवळ सात दिवसाच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना काय काय मिळते याबद्दल मार्गदर्शन करताना पुढील गोष्टी सांगितल्या. : 


आनंद, उत्साह, प्रोत्साहन, जिव्हाळा, एकमेकांची काळजी असते, सुसंवाद असतो, सहकार्य मिळते, शक्ती, दिलासा मिळतो, प्रबोधन होते, आदर, प्रेम, आपुलकी असते, समन्वय, सामंजस्य असते, मार्गदर्शन मिळते, समुपदेशन होते, सामाजिक दृष्टिकोन तयार होतो, व्यक्तिमत्वाचा विकास-मनोबल वाढते, वक्तृत्व कला विकसित होऊन आत्मीयता, आपलेपणाची भावना निर्माण होते, मनांची मशागत होते, अंतःकरण व्यापक होते,  एकटेपणा, निराशा दूर होते, आत्मविश्वास वाढतो, विचार प्रगल्भ होतात, भाषण, संभाषण सुधारून आत्मविश्वास वाढतो, मानसिक परिवर्तन घडून बौद्धिक विकास व भावनिक विकास होतो, सकारात्मकता संवेदनशीलता वाढते, रासेयोत कौशल्य विकसित होते, संयम शिकता येतो, ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन स्वयंशिस्तता निर्माण होते. केवळ सात दिवस शिबिराला येऊन एवढ्या गोष्टी स्वयंसेवकाला प्राप्त करता येतात. तेही केवळ दरवर्षाला फक्त दहा रुपये प्रवेश फी भरून शिबिरामध्ये सात दिवस दोन वेळ, चहा एक वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण सेवकांना दिले जाते. म्हणून सेवाभावी वृत्तीने काम करणारी राष्ट्रीय सेवा योजने शिवाय दुसरी कोणतीही योजना कार्यरत नाही.



महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकदा शिबिर केलेच पाहिजे असे प्रमुख अतिथी गणेश पाटील यांनी आवाहन केले. सौ दीक्षा गणेश पाटील सायबर ऑडिटर यांनी ऑनलाइन आपली फसगत होऊ नये यासाठी मोबाईल मध्ये कोणत्या सेटिंग करून घ्याव्यात तसेच कोणती दक्षता पाळावी याबद्दल मार्गदर्शन केले.  


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय. भंगाळे शिबिराचा उद्देश सफल झाल्याचे समाधान व्यक्त करून सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक - ईश्वर चौधरी, व सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका कु.वर्षा परदेशी यांची नावे घोषित केली. 



या कार्यक्रमाप्रसंगी कळमोदा गावाचे ग्रामसेवक के. जी. धांडे, विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष भास्कर बोंडे, जि.प. मराठी मुलांची शाळा मुख्याध्यापक सौ. करुणा वाघ, सर्व सहकारी शिक्षक/शिक्षिका, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अबू बकर, हमीद पिंजारी यांनी स्वयं सेवकांमधील शिस्त पाहून मी फारच भारवलो. दुर्दैवाने समाजातील सर्वच तरुण अशा शिस्तीचे दिसत नाही याची खंतही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. 


शिबीर यशस्वी करण्यासाठी, सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी, सहा. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.पल्लवी भंगाळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो विद्यार्थिनी प्रतिनिधी-कु. वर्षा परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी धिरज बैरागी यांनी मानले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post