Khandesh Darpan 24x7

अंधश्रद्धा विवेक शक्तीला बोथट करत असते: डॉ.शरद बिऱ्हाडे


प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय, ऐनपुर च्या राष्ट्रीय सेवा योजना एकक द्वारा आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर बलवाडी येथे आयोजित करण्यात आले. 

या शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून डॉ. शरद बिऱ्हाडे बोलत होते.  त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात परंपरागत बोथट विचारांचा त्याग करून जीवनात पुढे गेले पाहिजे, जास्तीत जास्त शाश्वत आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचा अवलंब करून सत्याचा स्वीकार केला पाहिजे. 



अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि विकृत लोकांच्या नादी लागून आपला वेळ, पैसा आणि सामर्थ्य वाया घालविण्यापेक्षा डोळसपणे शाश्वत विचारांचा अवलंब करावा, चिकित्सक नजरेने या सर्व गोष्टींकडे पहावे जेणेकरून आपली आणि आपल्या आसपासच्या समाजाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. 


तरुणांनी या सर्व अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यातले तथ्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा आणि समाजाची दिशाभूल करणाऱ्या शक्तींपासून समाजात जागरूकता निर्माण करावी, कारण अंधश्रद्धामुळे मानवाची विवेक शक्ती बोथट होते.  विचार करण्याची क्षमता थांबवित असते, परावलंबी बनवते आणि चुकीच्या मार्गाने यश मिळविण्यासाठी प्रेरित करत असते.  अंधश्रद्धा हे असे मृगजळ आहे  ज्यात जो अडकला त्याचा बळी पळतो म्हणून आपण वेळीच या गोष्टी ओळखल्या पाहिजे असे आवाहन डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी केले.



प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय, ऐनपुर च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एस. बी.पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, प्रा. डॉ. विजय सोनजे, व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सूत्रसंचलन  स्नेहा अवसरमल, पाहुण्यांचा परिचय  दिपाशा गुरव तर आभार स्नेहा अवसरमल या विद्यार्थिनीनी  केला.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم