सातपुडा विकास मंडळ संचालित, कृषी विज्ञान केंद्र, पाल आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण युवकांसाठी कौशल्यावर आधारित ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 23 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान कृषि विज्ञान केंद्र, पाल येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात 16 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाला अजित पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ, पाल, प्रकाश तोताराम चोपडे (प्रगतीशील शेतकरी) यावल उपस्थित होते.
या प्रशिक्षणा दरम्यान रोपवाटिकेची ओळख, अभिवृद्धीच्या पद्धती, रोपवाटिकेतील पोषण व्यवस्थापन, रोपवाटिकेचे पीक संरक्षण, रोपवाटिकेतील व्यवस्थापन पद्धती, रोपवाटिकेत कलमा रोपांची निर्मिती, रोपवाटिकेचे अर्थशास्त्र, शासकीय योजना, तसेच प्रात्यक्षिके आणि यशस्वी रोपवाटिका उद्योजक यांचे मार्गदर्शन व शैक्षणिक सहल चे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी श्रीमती. विजयाताई बोंडे (संचालिका, सातपुडा विकास मंडळ, पाल) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर व्हावे व उत्तम आणि गुणवत्तापूर्ण कलमे, रोपे, बियाणे यांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा आणि शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ.धिरज नेहेते यांनी काम पाहिले तसेच श्री.महेश महाजन, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, पाल, श्री. अतुल पाटील, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल, श्री. प्रशांत बोंडे, प्राध्यापक, कृषी तंत्र विद्यालय, पाल यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले.
श्री. कुंदन चौधरी, श्री. मयूर नारखेडे, श्री. रहेमान तडवी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment