प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
मॅनेज (हैदराबाद), आत्मा (जळगाव), वनामती (नागपूर) व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने 11 महिने कालावधीचा कृषी निविष्ठा विक्रेतांसाठी डेसी अभ्यासक्रम या पदविका अभ्यासक्रमाचे यशस्वीपणे आयोजन कृषी विज्ञान केंद्र पाल येथे करण्यात आले.
या अभ्यासक्रमाच्या परिपूर्ण प्रवेश प्रक्रियेत ४० कृषी निविष्ठाविक्रेत्यांनी प्रवेश घेतला होता त्या यशस्वी झालेल्या ४० कृषी निविष्ठाविक्रेत्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिरीष चौधरी, (आमदार, रावेर यावल विधानसभा क्षेत्र) हे होते.
त्यांनी उपस्थित सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगितले की कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास व पदविका प्राप्त केल्यानंतर आपण आपल्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रसार करण्याचे कार्य करावे त्याच पद्धतीने याप्रसंगी संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी भरडधान्य लागवड तंत्रज्ञान व त्याचे आरोग्यातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुरबान दळवी उपप्रकल्प संचालक महात्मा जळगाव यांनी स्मार्ट प्रधानमंत्री सूक्ष्म हुन्न खाद्ययन योजना तसेच इतर शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक महेश विठ्ठल महाजन यांनी केले कार्यक्रमाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत प्रसारित भरडधान्य उत्पादन तंत्रज्ञान या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
व्यासपीठावर याप्रसंगी अजितदादा पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ पाल, डॉक्टर एस. के. चौधरी उपाध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, डॉक्टर बी. आर. चौधरी प्राचार्य धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपुर, मयूर भामरे तालुका कृषी अधिकारी रावेर, अजय खैरनार मंडळ कृषी अधिकारी किनगाव, सुनील कोंडे तालुकाध्यक्ष रावेर डीलर्स असोसिएशन रावेर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर धीरज नेते यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी कर्मचारी वृंदावणे यांनी मेहनत घेतली.
Post a Comment