खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
केंद्र सरकार आता नागरिकांना मोफत डिश टीव्ही देणार त्यामुळे दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारणार असे केंद्र सरकारने म्हटले आहे तसेच यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च देखील करण्यात येईल , असेही केंद्र सरकारने म्हटले आहे
कोणाला मिळणार ? -
देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, अशा भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे.
यामुळे देशातील रोजगारालाही चालना मिळेल. देशभरात टीव्ही, रेडिओसह अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार असून, त्यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे.
दूरदर्शनमध्ये मोठ्या बदलांसह, सरकार व्हिडिओ गुणवत्ता देखील सुधारेल. यासोबतच जुने ट्रान्समीटरही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एफएम ट्रान्समीटर बसवणार असल्याची माहिती सरकारने दिली असून जुने ट्रान्समीटर अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment