Khandesh Darpan 24x7

फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेले तिसरे लेवागण बोली साहित्य संमेलनामध्ये एकमताने पारित ठराव ....!

प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


लेवा गणबोली साहित्य मंडळ जळगाव व मधुस्नेह परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे लेवागण बोली साहित्य संमेलन, फैजपूर येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनामध्ये खालील ठराव एकमताने पारित करण्यात आले. 

ठराव क्र. १ - 

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तीन डिसेंबर कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन "लेवा गणबोली दिन " म्हणून पाळला जावा.

सूचक - डॉ.अरविंद नारखेडे अनुमोदक - लीलाधर कोल्हे


ठराव क्र. २ -

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेत निवडून आलेल्या व नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन.

सूचक -डॉ अरविंद नारखेडे अनुमोदक - प्रभात चौधरी

ठराव क्र. ३ -

विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे आसोदा येथील स्मारक पूर्तता करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणारे आमदार माननीय संजय भाऊ सावकारे यांचे अभिनंदन.

सुचक - पराग तुकाराम पाटील अनुमोदक - प्रा विनय भा पाटील


ठराव क्र. ४ -

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मोताळा व नांदुरा तालुक्यातील वर्षानुवर्ष राहत असलेल्या पाच लाख लेवा पाटीदारांचा २०१८ मधील बुलढाणा गॅझेटीयर मध्ये उल्लेख न केल्यामुळे लेवा पाटीदार समाजाचा तसेच ही बोली बोलणाऱ्यांचा अपमान केलेला असल्यामुळे गॅझेटिअर विभाग प्रमुख डॉ. दिलीप प्र.बलसेकर यांचा जाहीर निषेध करीत आहोत 

सूचक -श्री नि रा पाटील अनुमोदक - प्रा. डॉ. विनय पाटील


ठराव  क्र. ५ - 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील "बहिणाबाई  अध्यासन केंद्र" मार्फत समाजातील संशोधन करणाऱ्या भाषा संशोधकांसाठी किमान पाच लाखाचा निधी "बहिणाबाई लेवागण बोली भाषा संशोधन प्रकल्प"  मंजूर करून देण्यात यावा व त्यासाठी आर्थिक तरतूद विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात करण्यात यावी व प्रतिवर्षी विद्यापीठामार्फत त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात यावे 

सूचक -प्रा डॉ के.जी. कोल्हे अनुमोदक - प्रा डॉ विनय पाटील

ठराव क्र. ६ -

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेवागणबोली भाषेला स्वतंत्र बोलीभाषेचा दर्जा देण्यात यावा असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या कला व सांस्कृतिक विभाग तसेच भाषिक अल्पसंख्यांक विभागाकडे पाठवण्यात यावा त्यासाठी सर्व संमेलनांचे संबंधित अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले

सूचक -प्रा  एकनाथ नेहेते /  श्री तुषार वाघुळदे  अनुमोदक - श्री विष्णूभाऊ भंगाळे

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post