प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दिनांक 16 जानेवारी सोमवार रोजी अल-हसनात उर्दू हायस्कूल, रसूलपूर येथे खान्देश व जळगाव जिल्हयातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व,कवी व कथा लेखक, तसेच डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, यावल चे माजी प्राचार्य रहीम रजा साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
रहीम रजा साहेबांची ओळख विद्यार्थ्यांमध्ये द्वैमासिक "तरजुमान-ए इतफाल" च्या माध्यमातून मुख्य संपादक म्हणून होती. पण त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्या मुळे विद्यार्थ्यांनी त्यांना प्रथमच पाहिले "रहिम रजा साहिब" यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अल-हसनात उर्दू हायस्कूल ही एक अशी शाळा आहे जिथे विद्यार्थी मोठ्या संख्येने द्वैमासिक "तरजुमान-ए इतफाल" खरेदी करून अभ्यास करतात.जळगाव जिल्ह्यातील बहुधा ही तिसरी मोठी संख्या आहे. जेथे मासिकाच्या इतक्या प्रती विकत घेतल्या जातात आणि वाचल्या जातात.या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या कथा, किस्से आणि इतर साहित्यकृती मासिकात प्रकाशित करण्यासाठी दर महिन्याला पोस्टाने पाठवतात हे विशेष. आठवी इयत्तेच्या विद्यार्थिनी "अर्शीन बी शेख अलीम" ने लिहिलेली कथा, नोव्हेंबर-डिसेंबरच्या तरजुमान-ए इतफाल या मासिकात प्रसिद्ध झाली होती. या कथेचे खूप कौतुक झाले आणि प्रसिद्ध कवी व लेखक रहीम रजा सरांनी अल-हसनात उर्दू हायस्कूलचे मुख्यद्यापक आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच अर्शीन बी आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन करताना, तरजुमान-ए इतफाल संदर्भात पुढील आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे खास निमंत्रणही त्यांनी दिले.
या शिवाय इ. 8वी. ची विद्यार्थिनी शिफा नाज शेख अकील हिने स्वतः लिहिलेली कविता सर्व शिक्षकांसमोर व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवली. रहीम रजा सरांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले, यासोबतच त्याला रोख पारितोषिक ही दिले. या अप्रतिम स्वागत समारंभात शाळेचे मुख्यद्यापक पठाण शकील खान सर तसेच सहाय्यक शिक्षक सादिक शेख सर, इम्रान खान सर, कुरेशी इलियास अहमद सर आणि अब्दुल सादिक सर उपस्थित होते. मुहम्मद फारुख भाई आणि रियाज मुहम्मद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, इलियास अहमद सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने रहीम रजा साहेब यांचे आभार मानले.
Post a Comment